अ टेल ऑफ फाईव्ह सिटीज !
4/03/2012 07:00:00 PM
आधी वडिलांची नोकरी, नंतर माझी नोकरी आणि मुळातच असलेली भटकायची आवड यामुळे आत्तापर्यंत जगप्रसिध्द अशा अनेक शहरांना भेट देण्याचा योग आला. ही कहाणी आहे मनात घर करून गेलेल्या ५ शहरांची. अ टेल ऑफ फाईव्ह सिटीज... माझ्या पर्यटकी नजरेतून.
अगदी लहान असताना म्हणजे नकळत्या वयात आणि नंतर पुन्हा नोकरी चालू झाल्यानंतर म्हणजे 'जाणत्या' (?) वयात साहेबाच्या देशात जायचा योग आला. सर्व जगावरच्या सत्तेची सूत्रे जिथे एकवटलेली होती अशी ही एकेकाळची जागतिक राजधानी, अर्थात लंडन पाहण्याची संधी मिळाली.
<img src="/vishesh_files/user/u19/london_bridge.jpg" width="700" height="467" alt="" />
पहिल्या ट्रिपमधलं लंडन अगदी पुसट, काढलेल्या फोटोंमध्ये साधारणत: जेवढं दिसतं तेवढंच आठवतं. पण दुसर्या वेळचं मात्र अर्थातच अगदी स्पष्ट आहे. लंडन म्हणजे राजेशाही थाट, लंडन म्हणजे राणीचं शहर, लंडन म्हणजे परंपरा याबरोबरच लंडन म्हणजे शिष्टपणा, लंडन म्हणजे माज... हे असलेले समज-गैरसमज अगदी व्यवस्थित अनुभवायला मिळाले. सुमारे २००० वर्षांचा इतिहास असलेलं हे शहर टिपीकल अमेरिकन शहरांसारखं एकाच साच्यातून 'पाडलेलं' अजिबात नाहीये. अगदी खेडेगावातल्यासारखे गल्ली-बोळ इथे पहायला मिळतात. फक्त अंगभूत शिस्त आणि कडक नियमांचा बडगा यांच्यामुळे या गल्लीबोळांमधूनदेखील दुमजली बस आणि आलिशान मोटारी लीलया धावत असतात. शिवाय प्राणांपेक्षा परंपरा महत्त्वाच्या या अलिखित नियमामुळे असलेल्या गोष्टी न बदलता त्यांचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर कसा करता येईल यावर जास्त विचार केलेला दिसतो. भल्यामोठ्या इतिहासात लंडनने अनेक चढउतार बघितले. १६६५ मधली प्लेगची साथ, भीषण आग, दुसर्या महायुध्दात हिटलरने केलेला अव्याहत बाँबवर्षाव या सगळ्यामुळे अनेकदा लंडन अगदी उद्ध्वस्त झालं; पण प्रत्येकवेळी तितक्याच ताकदीने त्यातून उभं राहिलं. कदाचित ह्या जिद्दीमुळेच लंडनवासीयांनी एकेकाळी जगावर राज्य केलं. आग, दोन महायुद्धे यांतून पुन्हा उभं राहिलेलं हे शहर आज बकिंगहॅम पॅलेस, बिग बेन, १० डाउनिंग स्ट्रीट, ब्रिटीश संसद यांसारख्या ऐतिहासिक वास्तू, सुप्रसिद्ध लंडन ब्रिज, टॉवर ब्रिज ,मध्ययुगीन युरोपातल्या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीची साक्ष असलेल्या अनेक इमारती यांबरोबरच अगदी आत्ताच्या सहस्रकाचं प्रतिनिधीत्व करणारे मादाम तुसॉचे प्रदर्शन, लंडन आय अशा विविध गोष्टी घेऊन थेम्स नदीच्या काठी दिमाखात उभं आहे. ही सगळी ठिकाणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते.
शहर जरी साच्यातून पाडलेलं नसलं तरी लंडनमध्ये दिसणारे ब्रिटीश लोक मात्र एकगठ्ठा सारखे. कडक इस्त्री केलेले चेहरे, चेहर्यावर असलेले स्थितप्रज्ञ भाव आणि 'आपण बरे, आपले काम बरे' अशा वृत्तीने चाललेला त्यांचा वावर. आजूबाजूचे लोक, घडामोडी यांबद्दल ते भारतीयांसारखं कुतूहल दाखवणार नाहीत, समोरून येणार्या अनोळखी व्यक्तीला अमेरिकनांसारखं 'हाय' करणार नाहीत किंवा ३/४ जणांच्या घोळक्यात राहून आशियाई लोकांसारखं कुजबुजणार किंवा खिदळणार नाहीत. पत्ता विचारला की आपण त्या गावचेच नाही अशा अर्थाचे (अगदी पुणेकरांसारखे) भाव चेहर्यावर दाखवणार. पण कामाला मात्र वाघ... दिलेल्या ८ तासांत काम म्हणजे कामच करतील, इकडे तिकडे बघणारसुद्धा नाहीत अन् ते ८ तास झाल्यावर मात्र त्या कामाकडे बघणारदेखील नाहीत. प्रत्येक बाबतीत अगदी काटेकोर शिस्त. बसमध्ये, ट्रेनमध्ये आपणहून कोणाशी बोलणार नाहीत. जर कोणी स्वत:हून संवाद साधायचा प्रयत्न केला तर बोलतील... पण तेही मोजून मापून आणि अगदी शिष्टाचार पाळून. आपला देश, आपला इतिहास, आपली राणी या सगळ्यांचा मात्र प्रचंड अभिमान. त्यामुळेच भावनेच्या भरात टिम हेन्मनची पीट सँप्रस, आंद्रे आगासी यांच्याबरोबर, ग्रॅमी हिकची थेट डॉन ब्रॅडमनबरोबर तर बेकहॅमची पेलेबरोबर नुसती तुलनाच नव्हे तर बरोबरीच करून मोकळे होतील.
क्रीडाजगतातली तीर्थक्षेत्रे मानली जाणारी दोन ठिकाणं - विंबल्डन आणि लॉर्डस् क्रिकेट मैदान हीदेखील लंडनमधली प्रमुख ठिकाणे. ही ठिकाणंही साहजिकच ब्रिटिशांच्या परंपरांमधून सुटलेली नाहीत. लॉर्ड्सवर सामना असताना कोणाला यजमानांचा दर्जा मिळणार, कोणाला पाहुण्यांचा, कुठल्या बाजूची ड्रेसिंग रूम यजमानांची, यजमानांचा कर्णधार कुठे बसणार इथपासून ते स्टेडियममधल्या आरक्षित जागा, क्लबमेंबर्सच्या बसण्याचे प्राधान्यक्रम, ड्रेसकोड हे सर्व लॉर्डस् बांधलं तेव्हापासून आजतागायत तसंच चालू आहे. अगदी आत्तापर्यंत लॉर्डस् येथील गॅलरीत महिलांना प्रवेश नव्हता, कारण ते परंपरेविरुद्ध होतं. विंबल्डनच्या स्टेडियममध्ये अगदी कालपर्यंत सर्व खेळाडूंना राजघराण्याच्या व्यक्तींसाठी असलेल्या विभागासमोर झुकून अभिवादन करावं लागत असे... मग भले तिथे कोणी उपस्थित असो अथवा नसो !
हिथ्रो विमानतळ आणि मेट्रो हे लंडनवासियांचे आणखी दोन वीक पॉईंट्स. त्यापैकी हिथ्रो विमानतळ म्हणजे आधुनिक एस.टी. स्टँड आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाला न साजेशी सुमार सजावट, भयंकर गर्दी, मोठ्यामोठ्या रांगा आणि एकूणात अनागोंदी कारभार यामुळे सिंगापोर, हाँगकाँग, दुबई इथल्या टुमदार विमानतळांच्या तुलनेत हिथ्रो जरा मागेच पडतं. महायुद्धाच्या काळात बाँबवर्षावाने बेचिराख होऊ नये म्हणून जमिनीखालून बांधलेली मेट्रो शहरभर उत्तम जाळं विणते. ही मेट्रो असल्याने लंडनमध्ये फिरणं फारच सोपं होतं. मेट्रो रेल्वे तसंच लांब पल्ल्याची रेल्वे यांपासूनच प्रेरणा घेऊन भारतातली रेल्वे उभारली गेली, पण आज भारत पाहिलेले ब्रिटीश लोकं कबूल करतात की तिथल्यापेक्षा भारतात रेल्वे अधिक व्यापक प्रमाणात वापरली जाते. लंडनमधलं ट्रॅफेल्गार स्क्वेअर, व्हिक्टोरीया टर्मिनस हे आपल्याला अगदी मुंबईची आठवण करून देतात. तिथे गेलं की थेट फोर्ट, सीएसटी परिसरात गेल्यासारखं वाटतं आणि अस्सल मुंबईकराला ब्रिटीशांचा शिष्टपणा आणि अतिरेकी परंपरा वगळता लंडन एकदम जवळचं वाटून जातं.
एकीकडे लंडन बाबा आदमच्या जमान्यातल्या परंपरा जपायचा अट्टाहास करत असतानाच मुंबईसारखंच फक्त 'आज' आणि 'उद्या'चा विचार करणारं, जगाची आर्थिक राजधानी असलेलं शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कला ना इतिहास जपत बसायची आवड आहे ना वेळ. परवापर्यंत लोक सर्वात उंच इमारत म्हणून एंपायर स्टेटमध्ये जात होते, काल वर्ल्ड ट्रेड सेंटर बांधल्यावर तिथे जायला लागले अन् आज ते पडल्यावर पुन्हा त्याच उत्साहाने एंपायर स्टेटमध्ये जायला लागले. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पडण्याबद्दल दु:ख आणि चीड जरूर आहे, पण म्हणून गळे काढत रडत बसून थांबून रहायची वृत्ती मात्र नाही. उद्या कदाचित वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षाही उंच इमारत बांधली जाईल आणि पूर्वीपेक्षा जास्त अभिमानाने हे लोक तिकडे जाऊ लागतील. न्यूयॉर्कसुद्धा मुंबईप्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर सारखं पळत असतं. इतिहासात रमणार्या किंवा साहेबी राज्य बघितलेल्या कालच्या पिढीतल्या मुंबईकरांना लंडनशी जवळीक वाटते, तर वर्तमानात जगणार्या आणि आजच्या मुंबईकरांना न्यूयॉर्क आपलसं वाटतं. न्यूयॉर्कचं मुंबईशी अजून एक साम्य म्हणजे तिथली सामाजिक सरमिसळ. मुळात न्यूयॉर्क नव्हतंच. ते वसवलं बाहेरच्या लोकांनी. त्यामुळे इथे मूळचे लोक किंवा 'भूमिपुत्र' वगैरे प्रकार तसं बघायला गेलं तर नाहीतच. जे आले ते इथलेच झाले. आजही स्वातंत्र्यदेवता येणार्यांचं स्वागत करतेच आहे.
<img src="/vishesh_files/user/u19/NY.jpg" width="375" height="500" alt="" />
त्यामुळेच अमेरिकेतलं सगळ्यांत मोठं चायना टाऊन, सगळ्यांत मोठी भारतीय वस्ती, सगळ्यांत जास्त वेगवेगळ्या वंशाचे लोक हे न्यूयॉर्कमध्ये किंवा आसपास पहायला मिळतात. आतापर्यंतच्या तीनही भेटींमध्ये न्यूयॉर्कचं वेगवेगळं रूप पहायला मिळालं, पण कायम होता तो तिथला सळसळता उत्साह. एकदा पाहिलं ते थंडीत कुडकुडणारं, स्वेटर-मफलरमध्ये गुरफटलेलं न्यूयॉर्क, तर बाकी दोनदा उन्हातान्हात टॅन झालेलं न्यूयॉर्क. पण प्रत्येक वेळी तितकाच उत्साह, आनंद, धावपळ, सामावून घेणारं आश्वासक स्मित... एखादा उत्सव किंवा सण चालू असावा तसं.
पाच बेटांवर मिळून वसलेली ही नगरीसुद्धा मेट्रो तसंच बसने सहज पालथी घालता येते. फक्त इथली मेट्रो ही लंडनइतकी सुटसुटीत वाटत नाही. अर्थात इथल्या मेट्रोत मात्र गप्पा, हसणं-खिदळणं हे सगळं सर्रास दिसतं. कोणी नवखा नकाशा बघत असेल तर एखाद्या काकू किंवा एखादे आजोबा स्वतःहून 'मदत हवीये का?' म्हणून विचारतील, तिथल्या आसपासच्या ठिकाणांची माहिती देतील. प्रत्येकजणच बाहेरून आलेला त्यामुळे मदत करण्याची, सामावून घेण्याची वृत्ती बहुधा आपोआपच आली असावी. न्यूयॉर्कला जाणारा पर्यटक दिवसा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, मादाम तुसॉ, एनबीसी स्टुडीओ, वॉल स्ट्रीट अशा ठिकाणी रमतो; रॉकफेलर सेंटरपाशी बसून कॉफी घेऊन थोडा विसावा घेतो आणि एंपायर स्टेटवरून सूर्यास्त बघतो. नंतर रात्री टाईम स्केअरवर येऊन दिव्यांचा झगमगाट बघतो. एखादा रसिक ब्रॉडवेचा शो बघण्यात रमतो, तर एखादा विज्ञानप्रेमी सायन्स सेंटर/नासा सेंटर इथे रमतो. तसं बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी गेल्या १०० वर्षांच्या आसपासच्या. पण हे आधुनिक सौंदर्यदेखील अतिशय आनंद देऊन जातं. याच शहरातल्या मनाला भावलेल्या आणखी दोन गोष्टी म्हणजे सेंट्रल पार्क आणि ब्रुकलिन ब्रिजचा परिसर. डाऊनटाऊनच्या सिमेंटच्या जंगलाच्या इतकं जवळ सेंट्रल पार्करुपी खरं जंगल असू शकेल यावर विश्वासच बसत नाही. इथली बिल्डर लॉबी तितकीशी बलवान दिसत नाही. :) भर शहरात हे सेंट्रल पार्क जपणार्यांना खरच सलाम ! ब्रुकलिन आणि मॅनहॅटन ह्या दोन बेटांना जोडणारा ब्रुकलिन ब्रिज ही पण अशीच सुंदर जागा आहे. एका बाजूला दिसणारं मॅनहॅटन, दूरवर दिसणारा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, खाडीचा रम्य परिसर आणि अखंड वाहत असलेला किंचित खारा वारा आणि खालून जाणार्या वाहनांच्या आवाजाने निर्माण होणारा एक प्रकारचा ट्रान्स आपल्याला गजबजाटातही शांतता आणि एकांत मिळवून देतो !
विंबल्डन सारखाच टेनिसचा एक उत्सव इथेही भरतो. सरत्या उन्हाळ्यातले दोन आठवडे मिळून अमेरिकन टेनिस स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये भरवली जाते. विंबल्डनमधली कडक शिस्त, एक प्रकारचा दरारा तिथेच सोडून सर्व टेनिसजगत उत्साह, दंगामस्ती घेऊन इथल्या बिली जीन किंग स्टेडीयममध्ये दाखल होतं. या सोहळ्यालादेखील जगभरातले टेनिसप्रेमी हजेरी लावून जातात. टिपीकल अमेरिकन पद्धतीच्या मार्केटिंगचा उत्तम नमुना असेलेली ही स्पर्धा असते... मात्र एकदम थाटातली आणि बघण्यासारखी.
प्रत्येक मोठ्या शहराला अगदी जवळच एखादा प्रतिस्पर्धी असतो आणि या दोन शहरवासीयांची आपापसांत सतत तुलना/स्पर्धा चालू असते. आपल्याकडे मुंबई-पुण्याची जशी जुगलबंदी चालते तशीच इथे अमेरिकेत न्यूयॉर्क आणि शिकागो यांच्यात चालते. वास्तविक दोन्हींमध्ये साम्य आणि फरकदेखील खूप... पण या दोन्ही शहरांचा आपापला एक थाट आहे.
<img src="/vishesh_files/user/u19/Chicago_Skyline_1_.jpg" width="667" height="500" alt="" />
सेंट लुईसला असताना शिकागो अगदी अंगण-ओसरी असल्याने शिकागोला अनेकदा भेटी दिल्या आणि नंतर नंतर तर कितव्यांदा हे मोजणंपण सोडून दिलं होतं. सुमारे २०० वर्षांपूर्वी शिकागो नदीच्या परिसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्या वासावरुन नदीला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण) असं नाव दिलं. पुढे त्या नदीकाठी वसलेल्या शहराचं नावदेखील तेच पडलं. त्याचा अपभ्रंश होत शिकागो असं नाव प्रचलित झालं. भौगोलिकदृष्ट्या अतिशय सोयीचं स्थान आणि जवळच असलेल्या 'लेक मिशिगन'च्या पाण्याचा मुबलक साठा यांमुळे आसपास अनेक कारखाने/उद्योग सुरू झाले. या सगळ्या कारखान्यांमधून येणारं प्रदूषित पाणी पुन्हा लेक मिशिगनमध्येच सोडल्याने लेकचं आणि शिकागो नदीचं बेसुमार प्रदूषण झालं. दरम्यान, शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा डाऊनटाऊन परिसर वसण्यास सुरुवात झाली. उंचच उंच इमारतींनी हा परिसर गजबजू लागला. मात्र १८७१मध्ये लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला. 'द ग्रेट शिकागो फायर' या नावाने ओळखल्या जाणार्या या आगीची व्याप्ती एवढी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबीचा आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला. त्यावेळेला असलेल्या सोयींच्या अभावामुळे आगीची माहिती अग्निशामनदलाला सुमारे ४० मिनिटांनंतर समजली. प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर तयार झालेल्या ग्रीजसारख्या जाड थरामुळे ही आग नदीमार्गेही पसरली. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणणं होतं की झालं ते चांगलंच झालं, शहर बांधताना आधी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची संधी मिळाली आणि याच लोकांच्या अथक परिश्रमाने आज दिसतं, ते भव्यदिव्य शिकागो पुन्हा उभं राहिलं !
शिकागो म्हटलं की प्रत्येक भारतीयाला आठवतं ते स्वामी विवेकानंदांचं भाषण. हे भाषण ज्या सभागृहात झालं ते सभागृहदेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, पण पुढे स्वामी विवेकानंदांचं नाव त्याच परिसरातील एका रस्त्याला दिलं गेलं. तिथे जवळच असलेल्या भवनात स्वामी विवेकानंद सोसायटीतर्फे आजही उपक्रम चालवले जातात. पूर्वी डाऊनटाऊनजवळ लेक मिशिगनवर यूएस नेव्हीचं प्रशिक्षण केंद्र (नेव्ही पिअर) होतं. पण पुढे ते बंद करुन त्याचं पर्यटनस्थळ केलं गेलं. हा परिसर अतिशय रम्य आहे. इथून सुटणार्या क्रूझवरून सूर्यास्त आणि डाऊनटाऊनमधल्या उंच उंच इमारतीचं दृष्य पाहण्यासारखं असतं.
शिकागोमधले लोकपण न्यूयॉर्कसारखेच आनंदी, उत्साही, चटकन संवाद साधणारे. तिथल्या भयंकर थंडीला ते इतके वैतागलेले असतात की उन्हाळ्याचे ४ महिने म्हणजे त्यांना अगदी सणासुदीच्या काळासारखे असतात. शिकागो डाऊनटाऊनचं रूप प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं भासतं. उन्हाळ्यात ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं... पानगळीच्या सुमारास खेळून दमलेल्या पण तरीही अजून खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं आणि थंडीची चाहूल लागलेली असल्याने जरासं काळजीत असतं... भर हिवाळ्यात ते थंडीनी पिचून गेलेलं असतं, त्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतं, नाताळाचा उत्साह, दिव्यांची रोषणाई जरी असली तरी वातावरण गूढ असतं, यावेळी अगदी शिष्ट लंडनची आठवण होते :)... तर वसंतात परत एकदा उन्हाळ्याच्या तयारीला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी एखाद्या कार्याच्या आधीचा तयारीचा काळ वाटतो. लंडन, न्यूयॉर्क यांच्यासारखी शिकागोची मुंबई किंवा भारतातल्या इतर शहरांशी जवळीक जरी वाटत नसली, न्यूयॉर्कसारखं ते आपल्याला चटकन सामावून घेईल की याबद्दल जरी खात्री वाटत नसली तरी ते चटकन आवडून जातं... कदाचित त्याच्या रुबाबामुळे आणि विविध रूपे दाखवणार्या निसर्गामुळे !
जाता जाता, लंडनसारखाच शिकागोचा ओ'हेर विमानतळ 'सामान्य' वर्गात मोडणारा आहे !
विमानतळाच्या बाबतीत जरी लंडन, न्यूयॉर्क, शिकागो ही बडी शहरं मागे पडली तरी ही उणीव भरून काढली आहे ती सिंगापोर आणि दुबई ह्या आशियाई शहरांनी. इंग्लंड-अमेरिकेच्या मानाने दोन्ही शहरं भारतापासून जवळ आणि साधारण सारख्याच सोयीसुविधा असलेली... त्यामुळेच हल्ली भारतातून या दोन शहरी जाणार्यांचा ओघदेखील वाढला आहे. सिंगापोरचा चँगी विमानतळ हाच तिथलं एक प्रेक्षणीय स्थळ वाटावा एवढा सुंदर आहे. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ असा किताब दोन वेळा मिळवलेल्या या विमानतळावर तीन टर्मिनल्स असून याची धावपट्टी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हल्ली जर योग्य वेळी पोहोचलं तर तिथे उभं असलेलं एअरबसचं दुमजली विमान पण पहायला मिळतं !
हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोजक्या एकशहरी देशांपैकी एक असलेला हा देश अस्तित्वात आला तो १९६५च्या आसपास. तेव्हापासून त्याची सर्वच बाबतीतली प्रगती विलक्षण आहे. पर्यटन हा तिथला एक प्रमुख उद्योग असून हल्ली बाकीच्या आशियाई शहरांशी याची चांगलीच स्पर्धा चालू असते. पर्यटकांना इथलं खुलं वातावरण आवडून जात असावं. मोठ्या संख्येने मुस्लिम समाज असूनही मध्यपूर्वेत जसं त्यांचं दडपण वाटतं तसं इथे वाटतं नाही. इथले लोक खूपच प्रेमळ आणि अगत्यशील आहेत. कदाचित पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याने तसं वागणं भागच असावं. इंग्रजी ही प्रमुख भाषा असूनही काही काही ठिकाणी स्थानिकांशी बोलताना भाषेची अडचण जाणवते. आपण बोललेलं कळत नसेल तरी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न हे लोक करतात. एकूणच इथलं वातावरण खूपच 'होमली फीलिंग' देतं. भारतापासूनचं अंतर, राहणीमान, हवामान, कायदेकानून या सगळ्यांचा विचार करता नोकरी, उच्च शिक्षण यांसाठी बाहेर जाणार्यांना सिंगापोर हा उत्तम पर्याय आहे.
इथे दक्षिण भारतीय जनताही खूप आहे. त्यामुळे तामिळ भाषा ही प्रमुख भाषांपैकी एक आहे. सुरुवातीच्या एकदोन ट्रिपमध्ये इथलं पर्यटकी सिंगापोर म्हणजे लिटिल इंडिया, चायना टाऊन, सरंगून स्ट्रीट, त्यावरची महंमद मुस्तफासारखी शॉपिंग सेंटर्स पाहिली, तर शेवटच्या ट्रिपमध्ये ज्युराँग भागातलं आधुनिक सिंगापोर पाहिलं. जुराँग बर्ड पार्क, सेंटोसा आयलंड, झू ही पर्यटकांना हमखास आवडणारी ठिकाणं. सेंटोसा आयलंडवरची केबल कार, मोनोरेल, म्युझिकल फाऊंटन यांचं पूर्वी लोकांना खूपच आकर्षण असायचं. ज्युराँग परिसरात उच्च तसेच उच्च मध्यमवर्गीय सिंगापोरही पहायला मिळातं. याच परिसरातल्या चायनिज गार्डनमधला चिनी नववर्षाच्या वेळचा दिपोत्सवपण बघण्यासारखा असतो. अगदी अस्स्ल भारतीय जेवणापासून जगातल्या अनेक खाद्यपदार्थांचे नानाविध प्रकार शहरभर मिळतात. त्यामुळे खवैय्यांना मेजवानीच मिळते. ऑर्केड डिस्ट्रिक्ट परिसरात खरेदीप्रिय पर्यटकांची चंगळ होते.
<img src="/vishesh_files/user/u142/myph02.jpg" width="547" height="389" alt="" />
सिंगापोरचं आणखी एक आवर्जून उल्लेख करण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे सिंगापोर एअरलाईन्स... अतिशय आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव जरूर घेण्यासारखा असतो. या विमानकंपनीचं सगळंच काम अतिशय योजनाबद्ध रीतीने चालतं आणि 'ग्राहक देवो भव'चा पूर्ण अनुभव मिळतो.
खरेदी आणि खरेदीसाठीच बाहेर जाणार्यांच्या यादीतलं, सिंगापोरच्या बरोबरीचं, किंबहुना त्या यादीत सिंगापोरच्याही वरचं स्थान मिळवणारं आणखी एक आशियाई शहर म्हणजे दुबई. एकूण खरेदीसाठी फारसा नसलेला उत्साह आणि या सगळ्या शहरांपैकी कदाचित सगळ्यात कमी आवडल्याने दुबईचं फक्त एकदाच दर्शन झालं. संयुक्त अरब आमिरातींपैकी एक असलेलं हे शहर म्हणजे मध्यपूर्वेतील एक प्रमुख शहर आहे. इस्लामी राजवट असलेल्या या शहरातलं वातावरण तितकंसं खुलं वाटत नाही. सतत एक प्रकारचं दडपण जाणवत राहतं. साधारण सातव्या शतकाच्या सुमारास इथे इस्लामी राजवट आली. नंतर सापडलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे आर्थिक स्थिती एकदम सुधारली. आज तर 'ऑईल मनी'च्या जोरावर इथे वाळवंटात हिरवळ फुलवलेली दिसते. पण एकूणच या समृद्धीचा एक प्रकारचा माज इथल्या लोकांच्या देहबोलीतून, वागण्यातून जाणवतो. लंडनमध्येही हे थोड्या प्रमाणात दिसतं, पण तिथला बडेजाव हा स्वत:ला अजूनही राजे समजण्यातून आलेला वाटतो; तर दुबईत मात्र पैशाचा माज जाणवतो.
<img src="/vishesh_files/user/u19/dubai-gold-souk.jpg" width="112" height="166" alt="" />
खाडीने दुबईची 'बर दुबई' आणि 'देरा दुबई' अशा दोन भागात विभागणी केली आहे. खाडीच्या किनार्याचा परिसर छान आहे. दिवसभर उन्हात भाजून निघाल्यावर इथल्या थंड वार्यात छान वाटतं. बर दुबई भागातल्या जुन्या इमारती जुन्या काळातल्या दुबईचं थोड्याफार प्रमाणात दर्शन घडवतात. पण इथे येणार्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खरेदी. त्यामुळे जिकडे तिकडे मोठे मोठे शॉपिंग मॉल्स. या सर्व मॉल्स आणि मार्केट्समध्ये अगदी आवर्जून बघावं ते म्हणजे 'गोल्ड सुक' किंवा सोन्याचा बाजार. तिथला लखलखाट डोळ्याचं अगदी पारणं फेडतो. तिथे दागिन्यांपासून सोन्याची बिस्कीटं/विटांपर्यंत सगळं काही बघायला मिळतं. ज्या गोष्टी आपण नेहमी चित्रपटात बघतो, त्या प्रत्यक्ष बघायला वेगळंच वाटतं.
बाकीच्या इस्लामी देशांपेक्षा दुबई बरंच पुढारलेलं आहे आणि पर्यटनविकासाच्या बाबतीत त्यांनी आधुनिकतेची कास धरलेली आहे. त्यामुळेच दुबईमध्ये कामानिमित्ताने आलेले परदेशी लोकपण बरेच दिसतात. भारतीयांमध्ये दक्षिण भारतीय आणि त्यातही केरळी लोक खूप आहेत. पर्यटनाला दिल्या जाणार्या प्रोत्साहनामुळे आज दुबईमध्ये अरबी संस्कृती दाखवणार्या जहाजसफरी, वाळवंटातल्या सफरी, अरबी जेवणाचा तसेच नृत्याचा आविष्कार दाखवणारी 'इव्हिनींग पॅकेजेस' उपलब्ध आहेत. त्याशिवाय, जगातलं सर्वात उंच हॉटेल अन् समुद्राखालचं प्रस्तावित हॉटेल ही अत्याधुनिक आकर्षणेदेखील दुबईमध्येच आहेत. दुबईमधल्या शॉपिंग फेस्टीवलच्या दरम्यान लाखो पर्यटक इथे हजेरी लावून जातात. त्याचबरोबर शारजामधले क्रिकेट सामने, टेनिस, फुटबॉलच्या स्पर्धा यांमुळे क्रिडाप्रेमीही दुबईकडे आकर्षित होताना दिसतात.
इथे मिळणारा खजूर आणि खजुराचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांच्यामुळे चवीने खाणार्यांची इथे चैन असते. पण एकंदरीत सोन्याचा चमचमाट, दिव्यांचा लखलखाट हा पायात बेडी असलेल्या कलावंताच्या आविष्कारासारखा वाटत राहतो. सिंगापोरला आलेल्याला आपलंसं वाटतं, तर दुबई ही आलेल्याला 'तुम्ही इथे पाहुणे आहात, पाहुण्यासारखेच रहा आणि वागा' अशी जाणीव करून देत राहते.
युरोप-अमेरिकेतल्या शहरांशी सिंगापोर, दुबईसारखी आशियाई शहरं सर्व बाबतीत आज जोरदार स्पर्धा करताना दिसतात. या स्पर्धेत मुंबई कधी दिसणार कोण जाणे?!
काही उणीवा असल्या तरी ही सगळी शहरं मनात घर करून, त्यांची आठवण ठेवून गेली हे मात्र नक्की. प्रत्येकाला आपापल्या समस्या आहेतच, पण या समस्यांवर मात करून जगाला आपली चांगली बाजू, हसरा चेहरा दाखवण्यात ही शहरं निश्चितच यशस्वी झाली आहेत. आलेल्या पाहुण्यासमोर रडगाणी गात न बसता त्याचं आतिथ्य करून त्याला आनंद देण्याची रीत ही शहरं व्यवस्थित पाळतात. या सगळ्या शहरांची संस्कृती, त्यांची जातकुळी संपूर्ण भिन्न, पण येईल त्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत करण्याची, सामावून घेण्याची आणि आपल्यामधून जग दाखवण्याची वृत्ती थोड्याफार फरकाने सगळीकडेच अस्तित्वात आहे. कदाचित म्हणूनच ही शहरे खर्या अर्थाने 'जागतिक' बनली असावीत.

Post a Comment